मुख्य सामग्रीवर वगळा

जगातलं सगळ्यात अजस्त्र विमान रशिया - यूक्रेन युद्धात नष्ट!

 रशिया यूक्रेन युद्ध अजून किती काळ चालणार आहे हा समस्त जागतिक समुदायाला पडलेला प्रश्न आहे. आणि तो रास्तच आहे. जीवितहानी आणि वित्तहानीच्या दृष्टीने कुठलही युद्ध असो त्याचे परिणाम समस्त जगाला आणि समस्त जागतिक समुदायला भोगावे लागतात. हे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी साऱ्या जगाने पाहिले आहे. समस्त युरोप खंड या दोन युद्धांमुळे  होरपळून निघाला होता. सगळ्यात भयाण परिस्थिती जपानने अनुभवली. हिरोशीमा आणि नागासाकी या जपानमधल्या दोन शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. दुसऱ्या महायुद्धानंतर परत अश्या प्रकारची युद्ध होऊ नये आणि चर्चेने शांततेने प्रश्न सोडवावे यासाठी संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांची निर्मिती झाली. यामुळे एक झालं ते म्हणजे छोटी छोटी युद्ध झाली, पण अणूयुद्ध झालं नाही. जागतिक सतांची विभागणी झाली. शीतयुद्धाचा फार मोठा काळ होता. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे युद्धाबरोबर अनेक संकट उभी राहतात. निर्वासितानची समस्या असते, लोक स्थलांतर करतात. दुसऱ्या देशात आश्रय घेतात. हे सगळं रशिया यूक्रेन युद्धातपण बघायला मिळतं आहे. हे युद्ध चालू असताना मात्र एक मोठी वस्तु गमावल्याची भावना युक्रेनवासीयांच्या मनात सल करून राहिली आहे. हे युद्ध सुरू झाल्यानंतर जगातलं सगळ्यात मोठ विमान नष्ट झालं आहे.

हे विमान होतं युक्रेनचं...  ते नष्ट केलं रशियाने...! कुठलं साधं विमान असतं तर त्याची चर्चा एवढी झाली नसती. पण हे एक विशेष विमान होतं. अंटोनोव्ह ए एन २२५... हे ते विमान. त्याचं नाव आहे- म्रिया (Mriya)! म्रिया हा युक्रेनियन शब्द त्याचा अर्थ होतो एक ‘स्वप्न’ ... हे विमान नष्ट झाल्याच्या वृत्ताला युक्रेन सरकारने दुजोरा दिला आहे. यूक्रेनच्या ‘युकरोबोरोंपरोम’  सरकारी संरक्षण कंपनीने याबद्दल सांगितलं आहे. हे अजस्त्र विमान रशियन फौजानी नष्ट केल्याचं यात म्हटलं आहे. हे विमान जरी नष्ट झालं असलं तरीसुद्धा आम्ही ते परत तयार करू असा आशावाद यावेळी कंपनीने व्यक्त केला. तसंच हे विमान आम्ही रशियाच्या पैशयाने बांधू हे सुद्धा अधिकारी सांगायला विसरले नाहीत.

खरं पाहिल्यास हे अजस्त्र विमान बांधायला तीन बिलियन डॉलर इतकं खर्च येणार आहे. तसंच विमान परत तयार करायला पाच वर्षाचा कालावधी लागेल. ‘कीव’ शहराजवळ हे विमान दुरुस्तीसाठी पार्क करण्यात आलं होतं. ‘होसटोमेल’ विमानतळावर हँगर मध्ये हे विमान होतं. रशियन फौजानी हे विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर अंटोनोव्ह् विमान नष्ट केल्याचं सांगितलं. युक्रेनचे अधिकारी अत्यंत संतप्त होऊन विमान  नष्ट केल्याच्या दुर्घटनेबद्दल बोलत होते. रशियाने आमचं नागरी उड्डयन क्षेत्र संपवल तसंच आमचं कार्गो क्षेत्रसुद्धा संपवलं, याची भरपाई आम्ही रशियनांकडून वसूल करू असं अधिकारी म्हणाले. ए एन २२५ हे विमान मागच्या तीस वर्षाहूंन अधिक काळ हवाई सेवेत होतं. म्रिया विमानाचं विशेष म्हणजे हे विमान जगातलं सगळ्यात जड वजन असलेलं विमान म्हणून परिचित होतं. साधारणपणे २५० टन इतकं सामान वाहून न्यायची याची क्षमता होती. याचबरोबर नागरी उडयन क्षेत्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात आकाराने मोठे पंख म्रियाचे होते. या विमानाची निर्मिती, त्याचं इंजिन हे सगळं ’६० च्या दशकात तत्कालीन सोव्हिएत रशियामध्ये सुरू झालं. मूलतः या विमानाची निर्मिती ही सोव्हिएत रशियाच्या अंतराळ कार्यक्रमासाठी म्हणून झाली होती. तेंव्हा अमेरिका आणि सोव्हिएत अंतराळ स्पर्धा ही चरम सीमेवर होती. अमेरिकेप्रमाणे या विमानाचा उद्देश शटल कॅरियर म्हणून वापरायचा होता. १९८८ साली या विमानाने आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं.

या विमानात ६ क्रू मेंबर्स असतात. याची कार्गो वाहून नेण्याची क्षमता आहे २५० टन... या विमानाची लांबी आहे २७५ फुट, तर ऊंची आहे ६० फुट. या विमानाचा मॅक्सिमम स्पीड आहे ८५० किलोमीटर प्रती तास. आणि सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे म्रिया हे जगातलं त्याच्या जातीतलं आता पर्यन्त तयार झालेलं एकमेव विमान होतं. नासाच्या उपग्रहानी विमान नष्ट झाल्याचे फोटो प्रकाशित केले आहेत.

हे विमान यूक्रेन लवकर तयार करो आणि हे अजस्त्र एकमेकाद्वितीय विमान परत हवाई सेवेत दाखल होवो अशी इछा व्यक्त करायला काहीच हरकत नाही... यासाठी रशिया युक्रेन युद्ध संपण्याची गरज आहे. तो पर्यन्त आपण ‘म्रियाच्या’ आठवणीत रमुयात.

 

-निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंतप्रधान मोदींची अमेरिका भेट

                                    फोटो- गुगलवरुन साभार.    पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 2 4 जून 2023 दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. ही भेट अधिकृत आहे म्हणजे ज्याला स्टेट व्हिजिट असं म्हणता येईल. ती अश्यासाठी की अमेरिकी अध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी फस्ट लेडी जिल बायडन यांच्या खास आमंत्रणवरून पंतप्रधान मोदी या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. खरं म्हणजे या स्टेट व्हिजिट या साधारणपणे राष्ट्राच्या प्रमुखांसाठी असतात. इंग्रजीत ज्याला आपण ‘हेड ऑफ द स्टेट’ यांची भेट म्हणू शकतो, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या हेड ऑफ द स्टेट आहेत. पण हे प्रथमच होतंय की सरकारचा प्रमुख म्हणजे ‘हेड ऑफ द गवर्नमेंट’ म्हणून पंतप्रधान मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. यावरून ही भेट अमेरिकेसाठी किती महत्वाची आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो. पंतप्रधान मोदी सुरवातीला म्हणजे 21 जूनला न्यूयॉर्क इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 जूनला मोदी हे वॉशिंगटन डी. सी. ला जातील. तिथे पाहुणे म्हणून व्हाईट हाऊसमध्य

तुर्कस्तान, नाटो आणि वादविवाद!

  रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध सुरू होऊन आता जवळपास तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये तर घमासान लढाई चालू आहे. कधी रशियाचं पारडं जड तर कधी यूक्रेन बलशाली होतो आहे का, रशियावर हावी होतो आहे का असं वाटू लागतं. बातम्या तर अश्या येतआहेत की आता रशिया आण्विक युद्ध सुरू करणार की काय... कोणी म्हणतं रशिया – युक्रेन युद्धाची परिणीती तिसरं महायुद्ध सुरू होण्यात होईल. कोणी म्हणतं आता तर युक्रेनला पाश्चिमात्य देश मदत करत आहेत, म्हणजे अमेरिका आणि तिचे मित्र राष्ट्र युक्रेनला युद्ध सामग्री पुरवत आहेत, त्यामुळे रशिया विरुद्धच युद्ध युक्रेन जिंकेल. हे कमी म्हणून की काय काही दिवसांपूर्वी फिनलंड आणि स्वीडन या देशानी रशियाच्या आव्हानाला घाबरून “आम्हाला नाटोचं सदस्यत्व द्या” अशी मागणी अमेरिकेकडे आणि नाटोकडे केली. अमेरिकेचा तर आनंद गगनात मावेना... जणू काही रशियाविरुद्ध हालचाली करण्याचा मनसुबाच आखला होता. यात भरिस भर म्हणजे तुर्कस्तान नावाच्या देशाने स्वीडन आणि फिनलंड यांच्या नाटो सदस्यत्वाला आम्ही विरोध करू, म्हणजे आम्ही व्हेटो (नकाराधिकार) वापरू आणि फिनलंड आणि स्वीडनला कदापिही ना

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह