ब्रिटन... ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला, खुद्द अमेरिकेलाही एकेकाळी वसाहत बनवणारा आणि भारतासारख्या देशावर तीनशे वर्ष अनभिषिक्त राज्य करणारा एक चतुर देश. ज्या देशाकडून जगाने राजकारणाचे धडे गिरवले... असा हा ब्रिटन! ज्या देशाकडून लोकशाही मूल्य आणि लोकशाही राज्यव्यवस्था इतर देशांमध्ये प्रवाहित झाली... असा हा ब्रिटन! तसा ब्रिटन हा राजेशाही व्यवस्था मानणारा देश. या राजेशाहीत राणीच्या हातात संवैधानिक सत्ता! हे जरी सगळं खरं असलं तरीसुद्धा ब्रिटनच्या राजकारणामद्धे एका महिलेला पंतप्रधानपद मिळायला १९७९ साल उजाडावं लागलं. आधुनिक काळात, ब्रिटनमध्ये द्विपक्षीय राज्यव्यवस्था अस्तित्वात आली. यातले दोन प्रमुख पक्ष म्हणजे कंझरवेटिव्ह पक्ष आणि लेबर पक्ष! अन्य बाकीचे छोटे पक्ष आहेत पण त्यांचं अस्तित्व नगण्य आहे. तर ब्रिटनमध्ये तीनदा निवडुन येऊन सरकार चालवण्याचा आणि पहिली महिला म्हणून पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मान ‘मार्गारेट थॅचर’ यांना जातो. थॅचर यांनी १९७९ ते १९९० असं एकूण ११ वर्ष ब्रिटनचं पंतप्रधानपद भूषवलं. इतिहासात आजच्या दिवशी म्हणजे ९ जून १९८३ ला थॅचर दुसऱ्यांदा घवघवीत यश मिळवून निवडू...
चालू जागतिक घडामोडींचा अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक परिचय...