मुख्य सामग्रीवर वगळा

इतिहासात आजच्या दिवशी झाले होते क्रायमियाचे हस्तांतरण ...

 क्रायमिया हा तसा पूर्व युरोप मधला, काळ्या समुद्राच्या उत्तरेला असलेला एक द्वीपकल्प... . याला लागून आहे अझोवचा समुद्र. आजचा क्रायमिया हा रशिया आणि यूक्रेन मध्ये विभागला गेला आहे. आजच्याच दिवशी म्हणजे १९ फेब्रुवारी १९५४ ला तत्कालीन सोव्हिएत रशियाने यूक्रेनला हा प्रदेश ‘मैत्रीचं प्रतीक’ म्हणून हस्तांतरित केला. क्रायमिया हा भाग नेहमीच रशिया आणि यूक्रेन यांच्यामधल्या वादाचा विषय राहिला आहे. इतिहासात, क्रायमिया कोणाचा यावरून तर युद्धसुद्धा लढली गेली आहेत. मध्ययुगापासून पुढे पाहिल्यास हा प्रदेश ऑटोमान तुर्काच्या साम्राज्याचा भाग होता. त्यानंतर सतराव्या शतकापासून पुढे रशियन साम्राज्याचा या भागावर वरचष्मा राहीला. तत्कालीन सोव्हिएत रशियाने तर १९५४ पर्यन्त क्रायमियावर राज्य केलं. क्रायमियाचं युद्ध आणि रशियातलं गृहयुद्ध यात तर क्रायमियाच्या लोकसंखेच्या विभागणीमद्धे  खूप मोठा बदल झाला.

जेंव्हा ऑटोमान लोक राज्य करत होते, तेंव्हा तातार लोकांची संख्या क्रायमियामध्ये ज्यास्त होती. तातार म्हणजे मुस्लिमवंशाचे तुर्क लोक... रशियनांनी जेंव्हा क्रायमिया मिळवला, तेंव्हापासून रशियन, यूक्रेनियन आणि तातार अशी लोकसंख्या विभागली गेली. १९४४ ला तर क्रायमिया मधल्या हालचालीनी कळस गाठला. रशियात स्टॅलिन हा तेंव्हा राज्य करत होता. १९४४ ला सोव्हिएत संघाच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख लावेरांती बेरिया याने स्टॅलिनच्या वतीने तातार वंशीय लोकाना क्रायमिया मधून हेतुपूरतसर हुसकावून लावलं. यामुळे तातार लोकसंख्या कमी होऊन तिथे रशियनवंशीय लोकसंख्या वाढली...

स्टॅलिनच्या मृत्यूनंतर म्हणजे १९५३ नंतर सोव्हिएत रशियामध्ये वेगवान राजकीय हालचाली सुरू झाल्या. सोव्हिएत महासंघामधल्या प्रजासत्ताक राज्यांच्याबाबत धोरण बदलली. तत्कालीन सोव्हिएत महासंघाच्या सुप्रीम प्रेसिडीयमने वटहुकूम काढून क्रायमिया ओबलास्ट या प्रजासत्ताक राज्याला यूक्रेन मध्ये समाविष्ट करायला परवानगी दिली. या सगळ्याचा करता करविता होता निकिता कृशचेव्ह... कृशचेव्ह हा स्टॅलिनच्या मृत्यूनंतर सोव्हिएत महासंघाचा सर्वोच्च नेता बनला. त्याला यूक्रेनबद्दल एक प्रकारची सहानुभूति होती... यूक्रेनबाबत सोव्हिएत संघाचे संबंध सुधारावेत यासाठी त्याने मैत्रीचं प्रतीक म्हणून क्रायमिया ओबलास्ट यूक्रेनला देऊ केला. याबाबत २५ जानेवारी १९५४ ला सोव्हिएत महासंघाच्या सुप्रीम प्रेसिडीयमने ठराव मंजूर केला आणि हुकूम जारी केला. आणि तो प्रत्यक्षात येण्यासाठी १९ फेब्रुवारी हा दिवस ठरवला गेला. शेवटी क्रायमियाचं हस्तांतरण झालं आणि हा प्रदेश सोव्हिएत रशियाने यूक्रेनकडे सुपूर्त केला.

कहाणी इथेच संपत नाही -

साधारण २००९ ला समोर आलेल्या एका नव्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी १९५४ रोजी सोव्हिएत महासंघाच्या प्रेसीडियमला क्रायमियावर निर्णय घेण्यासाठी पूर्ण गणसंख्या नव्हती. त्यामुळे कमी सदस्य संख्या असूनसुद्धा यूक्रेनला क्रायमिया देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं गेलं.  थोडक्यात सांगायचं तर कोरम पूर्ण नव्हती, २७ पैकी फक्त १३ सदस्य हजर होते... आणि म्हणून अश्या पद्धतीने हस्तांतरण करणे हे बेकायदेशीर आहे, तसंच संविधानाला धरून नाही असे ताशेरेसुद्धा २०१५ ला रशियन फेडरेशनच्या अधिकाऱ्यानी ओढत ते स्पष्ट केलं. १९९२ ला सोव्हिएत महासंघाने अधिकृतरीत्या हे स्पष्ट केलं की निकिता कृशचेव्ह यांनी देशद्रोह केला आहे आणि क्रायमिया यूक्रेनला देऊन रशियन लोकांचा विश्वासघात केला आहे... ही बाब खूपच गंभीर होती.

अश्या प्रकारे क्रायमियाचा तिढा सुटला असं वाटू शकेल पण तसं न होता हे संकट अजून गहिर झालं. क्रायमिया जणू अनंत काळासाठी धगधगता राहिला आणि रशिया-यूक्रेन वाद सतत उफाळत राहिला. याला दीर्घकालीन उत्तर शोधण्यापेक्षा आणि चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्यापेक्षा रशिया आणि यूक्रेन हे नेहमीच एकमेकाना दोष देत राहिले, प्रसंगी युद्ध करत राहिले... क्रायमिया युद्धभूमी झाली. आधुनिक इतिहासात एकाच वंशाचे लोक रशिया आणि यूक्रेनमध्ये आहेत. हस्तांतरित केलेल्या क्रायमिया मध्ये ज्या भावनेने कृशचेव्ह यांनी मैत्रीच प्रतीक म्हणून क्रायमिया यूक्रेनला देऊ केला, ती भावना लयाला जाऊन एकमेकांमध्ये वैरच वाढत गेलं.

आणि म्हणून क्रायमियाचा प्रश्न न सुटता तसाच राहिला. रशिया आणि यूक्रेन यांचा संघर्ष अजूनच तीव्र होत गेला. ही सगळी पार्श्वभूमी आहे क्रायमिया हस्तांतरणानंतरची! रशियाच्या महत्वाकांक्षेमुळे हा प्रदेश एकसंध न राहता दोन सत्तानमद्धे विभागला गेला. यामुळे भविष्यात अजून कलह निर्माण होणार होते.

-निखिल कासखेडीकर 

(हा लेख https://kfacts.in/ या पोर्टलवर फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रकाशित झाला आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...