मुख्य सामग्रीवर वगळा

रशिया - यूक्रेन संघर्षाच्या निमित्ताने...

 रशियन फेडरेशनने २०१४ साली यूक्रेन मध्ये झालेल्या उठावाच्या वेळी क्रायमिया हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. तसच लगेचच तिथे जनमत घेऊन सांगून टाकलं की क्रायमियामधल्या  ९६ टक्के जनतेला वाटतं आहे की रशियाने क्रायमिया स्वतःकडे घेऊन योग्यच केलं आहे. हे सगळ जरी खरं असलं तरीसुद्धा आज आपण क्रायमिया नक्की कोणाचा हा प्रश्न विचारला तर त्यावर उत्तर देणं कठीण आहे. याचं कारण २०१५ ला रशियाने क्रायमिया ताब्यात घेतलं. पण पाश्चिमात्य देशांनी क्रायमिया हा रशियाचाच एक भाग आहे हे मान्य करायला नकार दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेसुद्धा आणि अमेरिका आणि मित्र देशांनी यूक्रेनला पाठिंबा देत क्रायमिया हा रशियाचा भूभाग आहे हे मान्य करायला नकार दिला आहे. अमेरिकादी देश अजूनही क्रायमियाला यूक्रेनचाच भाग मानतात.

सध्या यूक्रेन - रशिया सीमारेषेवर तणावाचं वातावरण आहे कारण रशिया कुठल्याही परिस्थितीत यूक्रेन वर हल्ला करू शकतो असं चित्र तयार झालं आहे... रशियाने शीतयुद्ध संपल्यानंतर पाहिल्यानंदाच लाख भर सैन्य यूक्रेनच्या सीमारेषेवर आणून ठेवलं आहे. अमेरिकेला भीती आहे रशिया यूक्रेनवर हल्ला करेल याची... पण पुतीन म्हणतात की आम्हाला युद्ध नकोय, यावर बाइडेन यांचा विश्वास नाही...  रशिया आणि बेलारूस यांनी तर संयुक्तपणे लष्करी सराव सुरू केला होता.

क्रायमिया वरून रशियाने २०१५ ला युद्ध छेडलं. हा प्रदेश, भूतकाळात, इतिहासात का आपण हस्तांतरित केला याची रशियाला डोकेदुखी झाली असेल. रशिया आणि यूक्रेनमध्ये वाद असण्याचं  सध्याचं कारण म्हणजे रशियाला नाटोचा विस्तार पूर्व युरोपमध्ये होऊ द्यायचा नाही. पूर्वीच्या सोव्हिएत संघातल्या प्रदेशांमधे नाटोचा विस्तार होत गेला आहे. रशियाने पाश्चिमात्य देशांना  बजावलं आहे की आम्ही पूर्व युरोपमध्ये जे पूर्वीचे सोव्हिएत रशियातले प्रजासत्ताक प्रदेश होते तिथे नाटोचा विस्तार होऊ देणार नाही. तसंच पूर्व युरोपीय खासकरून पूर्वीच्या सोव्हिएत संघातल्या आणि आता स्वतंत्र झालेल्या देशाना नाटोचं सदस्यत्व द्यायलासुद्धा आणि तिथे लष्करी तळ उभारायलासुद्धा आमचा विरोध असेल.

सध्या प्रसारमाध्यमांमद्धे एक वेगळीच चर्चा सुरू आहे. त्या चर्चेनुसार रशिया यूक्रेनवर हल्ला चढवेल आणि चीन मग तैवानच्या दिशेन कूच करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे कितपत खरं आहे हे जरी बाजूला ठेवलं, तरीसुद्धा चीन तैवानवर आक्रमण करेल अशी तयारी चीन करतं आहे. पण चीन रशियाबद्दल काय धोरण ठेवेल आणि जर यूक्रेनवर रशियाने हल्ला चढवला तर चीन रशियाला मदत करेल का ...? हा मुख्य प्रश्न आहे. आणि याचं उत्तर म्हणजे चीन कदाचित तटस्थ भूमिका घेऊ शकतं पण ती सुद्धा एक मर्यादेपर्यंत... याचं कारण रशियाला एक मोठी सत्ता म्हणून चीनचा आधार आहे, आणि अमेरिकेविरुद्ध चीनच मदतीला धावून येईल, तसंच युरोपसुद्धा रशियावर वायु आणि तेल पुरवठयासाठी अवलंबून आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जर्मनीसुद्धा रशियाविरुद्ध बोलायला तयार नाही... याचं कारण यूक्रेनपेक्षा ज्यास्त महत्वाचं म्हणजे जर्मनीला होत असलेला वायु आणि तेलपुरवठा हेच आहे.

सद्य स्थितीत चीन हा रशियाचा व्यापारातला सगळ्यात मोठा सहकारी बनला आहे. रशिया आणि चीन यांच्या मध्ये एका करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. हा करार ४०० बिलियन डॉलर्सचा आहे. २०२५ पासून पुढच्या ३० वर्षांसाठी रशियाच्या गॅझप्रॉम कंपनीने चीनला गॅस पुरवठा करण्याचं नक्की केलं आहे.

आता या सगळ्यात भारताची भूमिका काय असेल याची उत्सुकता वाढली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत यूक्रेन समस्येबाबत घेतलेल्या मतदानाच्या दरम्यान भारत अनुपस्थित राहिला. याचा अर्थ भारताला अमेरिकेची बाजू घ्यायची नाही आणि रशियालासुद्धा दुखवायचा नाही, ही तारेवरची कसरत करावी लागते आहे. हीच भूमिका भारतासाठी योग्य राहील अशीच आहे. अमेरिकेला भारताने पाठिंबा दिला तर आपण रशियाला दुखवू आणि चिनविरोधात जी रशियाची मदत होऊ शकेल तिसुद्धा होणार नाही. इथे रशिया-भारत संबंधानमद्धे कटुता येऊ  शकते, तर इकडे भारतालासुद्धा अमेरिकेला नाराज करायचं नाही, कारण भारत अमेरिका संबंध हे आधी होते नव्हते इतके घट्ट झाले आहेत. याचं महत्वाचं कारण म्हणजे चीन विरोधात अमेरिका भारताला मदत करेल अशी अपेक्षा आहे.

आधी क्रायमिया वादाने आणि नंतर नाटोच्या विस्ताराला विरोध म्हणून रशिया एका बाजूला मजबूत आघाडी तयार करतो आहे. तर अमेरिकासुद्धा यूक्रेनच्या बाजूने उभा आहे.                    

इतिहासात झालेल्या चुका आता सुधारल्या नाहीत तर भविष्य फारसं सकारात्मक असणार नाही ही सध्याची परिस्थिति आहे... चर्चेद्वारे सध्याचा रशिया आणि यूक्रेनमधला वाद सोडवावा ही प्रमुख मागणी जागतिक समुदाय करतं आहे आणि भारतसुद्धा कूटनीतीद्वारे हा वाद सुटावा या मताचा आहे. हा प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. जागतिक सत्तांनी यापासून धडा घ्यावा ही अपेक्षा आहे...

-निखिल कासखेडीकर

(हा लेख https://kfacts.in/ या पोर्टलवर फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रकाशित झाला आहे)  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...