मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोना परत आलाय... चीनमध्ये!

 ही गोष्ट आहे २३ डिसेंबर २०२१ची. उत्तर चीनमधल्या शांक्सी विभागातल्या शियान शहरात अचानक एकच धावपळ सुरू झाली. चीनी सरकारी अधिकार्‍यानी फरमान काढलं- शहरातल्या सर्व म्हणजे १ कोटी ३० लाख नागरिकांनी घराच्या बाहेर अजिबात पडू नये... कारण कोरोना या जीवघेण्या रोगाचा फैलाव होतो आहे... यावेळी वेळीच उपाय नाही केले तर खूप गंभीर परिणामांना सगळ्यांना सामोरे जावं लागेल...

  चीनमध्ये साम्यवादी सरकार असल्यामुळे आणि चीनी सरकारचं माध्यमांवर नियंत्रण असल्यामुळे बातमी खरी असली तरी ती कितपत खरी आहे याबद्दल साशंकता निर्माण होऊ शकते. अर्थात आकडे बदललेले असतील पण परत कोरोना मूळ धरू पाहतोय की काय अशी परिस्थिती आता चीनमध्ये आहे. ज्याप्रमाणे आपण सहजरीत्या फेसबुक वापरू शकतो, आपली मतं मांडू शकतो, विरोध करू शकतो, हरकत घेऊ शकतो (कारण आपल्याकडे लोकशाही आहे)... चीनमध्ये अशी परिस्थिती नाही... याचं कारण चीनला आपल्या नागरिकाना स्वातंत्र्य मिळू द्यायचा नाही... आणि सध्याच्या शी जिनपिंग यांच्या सरकारने ती पुरेपूर खबरदारी घेतली आहे. विषय आहे चीनमध्ये कोरोना परतण्याचा! अर्थातच चीनी सरकारला खरी माहिती उजेडात येऊ द्यायची नाही, असाच अर्थ यातून निघतो.

  गम्मत म्हणजे काही वृत्तवाहिन्या या व्हायरसला कोरोना व्हायरस न म्हणता ‘वुहान व्हायरस’ म्हणतात. म्हणजे वुहान या शहरातून, तिथल्या प्रयोगशाळेतून हा व्हायरस सगळ्या जगभर पसरला आणि त्याचे परिणाम सगळी मानवजात भोगते आहे असा एक ठाम समज आहे. असो. तर विषय आहे कोरोना परतण्याचा... जसं जगभर सोशल मीडिया म्हणून सगळीकडे फेसबुक सर्वत्र वापरलं जातं त्याप्रमाणे चीनमध्ये फेसबुक वापरलं जात नाही याचा कारण चीनमध्ये फेसबुक या आणि इतर सगळ्या जागतिक मीडियाच्या वापरास बंदी आहे.  चीनमध्ये फेसबुकप्रमाणे वाईबो (Weibo) ही साईट स्थानिक चीनी नागरिक वापरतात॰ अर्थातच चीनी सरकारचं कडक नियंत्रण या साइटवर आहे. वाईबोला सरकारी वेबसाइट असं म्हटलं तरीसुद्धा काही हरकत नाही अशी परिस्थिती आहे.

  मात्र तुम्ही फार काळ जनतेला वेठीस धरू शकत नाही ही खरी गोष्ट आहे. चीनच्या शियान मधले नागरिक आता आवाज उठवू लागले आहेत असे चित्र आहे. नागरिकांनी तिथल्या सामाजिक माध्यमांवर आपल्या कैफियती मांडल्या. काहींनी फोटो टाकले. २३ डिसेंबर पासून सगळ्या नागरिकाना घरी बसायचे आदेश जारी केल्यामुळे त्यांची खूपच तारांबळ उडाली आहे. लोकांकडे खायला अन्न नाही. बाहेर तर पडू शकत नाही. चीनी अधिकार्‍यानी अन्नधान्याचा मोफत पुरवठा केला असून ते वाटण्यात येत आहे असं सरकारचं म्हणणं आहे. परिस्थिती तर इतकी गंभीर आहे की लोक चक्क वस्तुविनिमय (Barter) पद्धतीने रोजचं जीवन जगत आहेत. सिगरेटच्या बदल्यात कोबी, भांडीधुण्याच्या साबणाच्या बदल्यात सफरचंद, तर आपल्या व्हिडिओ गेमच्या बदल्यात नूडल्स असले भलतेच व्यवहार नागरिकाना करावे लागत आहेत. म्हणजे मध्ययुगीन परिस्थिती आहे की काय अशी शंका यावी.

  काही बातम्यांनुसार शियान इथल्या स्थानिक प्रशासनाने अन्नधान्याचे संकट उभे राहू नये, तसच लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून अन्नधान्याचे पॅकेट्स तयार करण्याचे आणि ते पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. जर व्यवस्था भक्कम असती तर लोकांनी तक्रारी केल्या नसत्या... पण तसं दिसत नाही.

  ओमायक्रोनचं थैमान सुरू आहे. अशी परिस्थिती असताना चीन सगळ्या जगाला कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहे याची चीनलासुद्धा कल्पना नसावी...

 यावर उपाय ? आपण आपली रोग प्रतिकारक शक्ति वाढवूयात, व्यायाम करूयात, आणि आपल्या सरकारने कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि काय करू नये हे सांगितल्यानंतर त्याचं तंतोत्तांत पालन करुयात आणि सुरक्षित राहूयात एवढंच आपण करू शकतो.

  चीनने हे संकट उभं केलं आहे आणि त्याचा त्रास जगाला होतो आहे... याचा विचार चीनी सरकार करेल अशी अशा बाळगणंच आपल्या हाती आहे...

-निखिल कासखेडीकर 

(https://kfacts.in/ या पोर्टल वर हा लेख जानेवारी 2022 मध्ये प्रकाशित झाला आहे.)    

(

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हे आहे ज्ञात इतिहासातलं सगळ्यात कमी काळ चाललेलं युद्ध!

  युद्धाच्या कथा रम्य असतात असं आपण नेहमी म्हणतो आणि ऐकतो. प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ असं आपण जर इतिहासाची काळानुसार विभागणी केली तर आपल्याला आढळेल की अगदी समस्त इतिहासात कुठली एक गोष्ट वारंवार घडत असेल तसंच कुठली एक गोष्ट शाश्वत असेल तर ती आहे युद्ध आणि युद्धच. यावर कोणाचही दुमत होणार नाही... मग तो इतिहास अगदी रोमन असो, ग्रीक असो, चीनचा असो ... थोडक्यात कुठलाही असो, पण याला अपवाद फक्त भारताचा आहे. भारताने स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी कधीही कोणावरही युद्ध लादलं नाही, हे विशेष आहे. साम्राज्यवाढीसाठी, त्याच्या विस्तारासाठी, महत्वाकांक्षेसाठी, अजरामर होण्यासाठी इतिहासात युद्ध लढली गेली... यात एकाचा जय तर दुसऱ्याचा पराजय... अगदी आजच्या काळातलं उदाहरण घ्यायचं म्हणजे रशिया आणि युक्रेनमधलं युद्धं. पुतीन यांचा उद्देश हा साम्राज्यविस्ताराचा आहे, तर यूक्रेनला वाचवण्यासाठी पश्चिमी जग पुढे सरसावलं आहे. तर अशी ही आहे युद्ध लढण्यामागची प्रेरणा. बरं ही युद्ध दीर्घ काळासाठी लढली गेल्याचीही उदाहरण आहेत. आधुनिक जगातलं विसाव्या शतकातलं उदाहरण घ्यायचं झाल्यास पहिलं आणि दुसरं महायुद्ध...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...