23 मार्चला इजिप्तच्या सुएझ कालव्यात एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या कंपनीचं एवर गिव्हन हे मालवाहू जहाज सुएझ कालवा पार करत असताना अडकून पडलं. ते जमिनीत रूतलं आणि ते अश्या पद्धतीने अडकून पडलं की दोन्ही बाजूनी येणार्या आणि जाणार्या मालवाहू जहाजांचा रस्ताच बंद झाला. यामुळे जलवाहतुकीवर परिणाम होऊन साधारणत: तीनशे मालवाहू जहाजं अडकून पडली आहेत. यामुळे खूप मोठं आर्थिक नुकसान जगाला झेलावं लागत आहे. तासाला 400 मिलियन डॉलर्स , तर दिवसाला 9.6 बिलियन डॉलर्स एवढं आर्थिक नुकसान होत आहे. 14 टग बोटी हे जहाज परत पाण्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत , याचं कारण , ते जहाज मातीत रूतलं आहे. काही बातम्यांनुसार यामुळे संपूर्ण जलवाहतुकीबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. याचं कारण असं आहे की , तज्ञांनी सांगितल्यानुसार सध्याच्या काळातली मालवाहू जहाज कमी कर्मचारी वर्ग , कमी जागेत खूप माल भरणे आणि कमी स्किल असलेला कर्मचारी वर्ग या सर्व गोष्टींमुळे जलवाहतुकीच्या क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘ एवर गिव्हन ’ या जहाजाबद्दल बोलायचं झाल्यास मालवाहू जहाजाचा कर्मचारी वर्ग हा भारतीय आहे . हे कर्मचार...
चालू जागतिक घडामोडींचा अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक परिचय...