ही गोष्ट आहे २३ डिसेंबर २०२१ची. उत्तर चीनमधल्या शांक्सी विभागातल्या शियान शहरात अचानक एकच धावपळ सुरू झाली. चीनी सरकारी अधिकार्यानी फरमान काढलं- शहरातल्या सर्व म्हणजे १ कोटी ३० लाख नागरिकांनी घराच्या बाहेर अजिबात पडू नये... कारण कोरोना या जीवघेण्या रोगाचा फैलाव होतो आहे... यावेळी वेळीच उपाय नाही केले तर खूप गंभीर परिणामांना सगळ्यांना सामोरे जावं लागेल... चीनमध्ये साम्यवादी सरकार असल्यामुळे आणि चीनी सरकारचं माध्यमांवर नियंत्रण असल्यामुळे बातमी खरी असली तरी ती कितपत खरी आहे याबद्दल साशंकता निर्माण होऊ शकते. अर्थात आकडे बदललेले असतील पण परत कोरोना मूळ धरू पाहतोय की काय अशी परिस्थिती आता चीनमध्ये आहे. ज्याप्रमाणे आपण सहजरीत्या फेसबुक वापरू शकतो , आपली मतं मांडू शकतो , विरोध करू शकतो , हरकत घेऊ शकतो ( कारण आपल्याकडे लोकशाही आहे ) ... चीनमध्ये अशी परिस्थिती नाही... याचं कारण चीनला आपल्या नागरिकाना स्वातंत्र्य मिळू द्यायचा नाही... आणि सध्याच्या शी जिनपिंग यांच्या सरकारने ती पुरेपूर खबरदारी घेतली आहे. विषय आहे चीनमध्ये कोरोना परतण्याचा! अर्थातच चीनी सरकारला खरी माहिती उजेडात ...
चालू जागतिक घडामोडींचा अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक परिचय...