मुख्य सामग्रीवर वगळा

उंच भरारी...!

विमानाने प्रवास करण्याची मजा काही वेगळीच असते. विमान जेंव्हा take off घेते, तेंव्हा आपण अंधातरी असल्याची भावना मनात निर्माण होऊन खाली पडू कि काय असे वाटते. थोडा वेळ हि भावना तशीच राहते. एका विशिष्ट उंची पर्यंत गेल्यानंतर  take off घेताना मागे झुकलेले विमान मग सरळ होते आणि मग कुठे बरं वाटत. विमान खाली उतरतानासुद्धा थोडी भीती वाटते. आकाशात विमानाने हेलकावे घेतल्यानंतर मग उतरताना एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे झुकून पायलट अंदाज घेऊन मग विमान runway वर उतरवतात. सगळ्यात घाबरवणारी गोष्ट म्हणजे turbulence हा प्रकार. विमान आकाशात असताना हवेचा दाब निर्माण होऊन हवेच्या पोकळीत गेल्यानंतर आपल्याला turbulence अनुभवायला येतो. ज्यांनी कोणी आतापर्यंत विमान प्रवास केला असेल, त्यांना हि गोष्ट चांगलीच माहिती असेल. खरं सांगायचं म्हणजे, turbulence आल्यानंतर कधी एकदा विमान स्थिर आणि सरळ उडते असं वाटायला लागते. महत्वाची गोष्ट म्हणजे, विमानाला काही दगा फटका झाला तर काय? आणि ते पडले तर काय? हि सतत वाटणारी भीती असते. कदाचित कोणाला हि भीती अनाठायी वाटेलसुद्धा, पण अशी भीती वाटणे हे नैसर्गिक आहे.          

आजमितीला जगभरात हवाई क्षेत्राचा विकास होतो आहे. अमेरिकेत तर अशी परिस्थिती आहे कि रेल्वेने किंवा गाडीने किंवा बसने जाणे परवडत नाही म्हणून लोक विमानाने प्रवास करतात. हे कोणाला भारतात सांगितले तर चमत्कारिक वाटेल, पण हे सत्य आहे. कमी वेळात आणि कमी खर्चात आपण अमेरिकेत हव्या त्या ठिकाणी पोहोचू शकतो. म्हणून अमेरिकेत विमान हे दळण वळणाचे एक सशक्त माध्यम आहे. हवाई क्षेत्रात नवीन नवीन संधीपण आहेत. आज काल असं म्हटलं जाते कि तंत्रद्यानाचा आणि ते विकसित होण्याचा वेग हा महाप्रचंड आहे. रोज नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होऊन त्यावर आधारित वस्तू बाजारात येत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. मग त्यात दुचाकी ते मोबाईल फोन अश्या सगळ्या वस्तूंचा समावेश होतो. हेच तंत्रज्ञान आता हवाई क्षेत्रात बदल घडवू पाहत आहे.



नुकतच बोईंग या विमान तयार करणाऱ्या सगळ्यात मोठ्या कंपनीने पॅरीस एअर शो च्या निमित्ताने त्यांच्या ब्रीफिंग मध्ये सांगितले आहे कि बोईंग आता चालक रहित विमान बनवण्याची चाचपणी करतो आहे. हे काम आता तरी प्राथमिक स्तरावर आहे आणि चालक रहित विमानाची शक्यता पडताळून पाहण्यासाठी संशोधन चालू आहे. बोईंगचे म्हणणे आहे कि, जर आपण ड्रोन आकाशात उडवू शकतो तर चालकरहित विमान आकाशात का नाही उडवू शकणार? आज अमेरिकी सैन्यदलाकडे ड्रोन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अमेरिका जेंव्हा दहशतवाद्यांवर हवाई हल्ला केल्याच्या बातम्या पुरवते तेंव्हा तो हवाई हल्ला म्हणजे लढाऊ विमानाने केलेला हल्ला नसून ड्रोनला छोट्या मिसाइल्स बांधून त्या ठराविक क्षेत्रावर सोडल्या जातात. अश्या परिस्थितीत अमेरिकेच्या एखाद्या सैनिकी तळावर बसून ड्रोनचा ऑपरेटर key pad/joy stick च्या सहाय्याने दुरून त्याच्या समोर स्क्रीन वर बघून ड्रोन ऑपरेट करत असतो.

बोईंग कंपनीच्या म्हणण्यानुसार अश्या तंत्रज्ञानाचे प्रारूप आपल्याकडे आहे, पण ते वापरायचे कसे आणि अमलात कसे आणायचे हे थोडेसे अवघड आहे. चालक रहित विमान उडवण्यासाठी आवश्यक ते सर्व काही करण्याचे बोईंग म्हणते आहे. आज जगात दोन भल्या मोठ्या विमान बनवणार्या कंपन्यांची मक्तेदारी आहे, एक म्हणजे अमेरिकेची बोईंग आणि दुसरी म्हणजे युरोपची एअर बस. यात नुकतीच भर पडली आहे ती चीनची. चीनने काही आठवड्यांपूर्वी C 919 हे चीनी बनावटीचे पॅसेंजर विमान यशस्वीरीत्या उडविले. याआधी रशियानेसुद्धा रशियन बनावटीचे MC-21 हे पॅसेंजर विमान यशस्वीरीत्या उडवले.



चालक रहित विमान बनवण्यासाठी लागणाऱ्या अल्गोरिदमवर सध्या काम चालू आहे असे बोईंगचे म्हणणे आहे. एकदा का या तंत्रज्ञानाचे प्रारूप पक्के झाले आणि त्यावरचे संशोधन झाले कि मग उत्पादन कसे करायचे यांवर बोईंग भर देईल. अर्थात हि वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. यात सगळ्यात मोठा चिंता करण्यासारखा भाग म्हणजे विमानाची सुरक्षा. विमान हवेत असताना त्याला काही झाले तर विमान सुरक्षित स्थळी उतरवण्यासाठी काय उपाय योजना केली पाहिजे हे बघणे महत्वाचे आहे. सामान्यतः विमान take off आणि land करताना पायलट आणि को-पायलट स्वतः ते करतात.

जर चालक रहित विमानाचा प्रयोग यशस्वी झाला तर हा हवाई क्षेत्रासाठी मोठा क्रांतिकारक बदल असेल. प्रवाश्यांची सुरक्षा हि सगळ्यात महत्वाची आहे, आणि हि काळजी एकदा दूर झाली कि मग अश्या विमानांचे उतपादन मोठ्या प्रमाणावर सुरु केले जाईल असा कयास आहे. याबरोबरच सुरक्षित take off आणि landing सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. बरं turbulence आला तर विमानाचा कॉम्प्युटर पण सशक्त पाहिजे, कारण अश्या परीस्थितीत विमानाला स्थिर ठेवणे आणि सुरक्षित उडवणे महत्वाचे आहे. त्यासाठी उच्च दर्जाचे कॉम्प्युटर्स विमानात बसवावे लागतील.

 इथे कोणाला असा प्रश्न पडू शकतो कि चालक रहित विमानाची काय आवश्यकता आहे? आता जे काही चालला आहे ते चांगलाच आहे कि! पण पुढच्या २० वर्षात रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या पाहणीनुसार जगातल्या हवाई क्षेत्रासाठी १५ लाख पायलटस् ची गरज भासणार आहे, त्यामुळे इतके पायलटस् आणायचे कुठून असा प्रश्न आहे, बरं असे पायलटस् जरी तयार झाले तरीही त्यांच्यावर जो खर्च म्हणजे त्यांचे पगार, त्यांना भत्ते दिली जाण्याची व्यवस्था करावी लागेल, त्यावर लक्षणीय खर्च होईल. याउलट जर एकदा तंत्रज्ञान विकसित करून असे विमान तयार झाले तर ते सोयीचे आहे.        

भविष्यात चालक रहित विमान हि गोष्ट नवीन राहणार नाही, आणि त्यासाठी ज्यास्त पैसेसुद्धा मोजावे लागणार नाहीत, असं आपण आता म्हणू शकतो. खरच विज्ञानाने आणि तंत्राद्यानाने उद्या हवाई क्षेत्रात अमुलाग्र बदल होतील असं म्हणण्यास वाव आहे. आपण फक्त प्रवास करण्याचा अवकाश, काय माहित उद्या आपण चालक रहित विमानाने एखाद्या प्रवासाला जाऊ!

निखिल कासखेडीकर 

(सर्व फोटो गुगलवरून साभार)  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...