मुख्य सामग्रीवर वगळा

सुसाट ड्रॅगन सुस्तावणार!


महाकाय चीनी अर्थव्यवस्थेमध्ये सध्या उलटे वारे वाहू लागले आहेत. या वर्षी चीनचा आर्थिक विकासदर अपेक्षेपेक्षा खूपच मंदावलेला असणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेच्या अहवालानुसार चीनी अर्थव्यवस्थेचा विकासदर चालू आर्थिक वर्षात . % इतका असणार आहे. % विकासदर आकडा तसा वाईट नाही, पण मागच्या २५ वर्षातील विकासदरांपेक्षा चालू विकासदर सगळ्यात कमी आहे, ही नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. आतापर्यंत जगात चीनी विकासदराला, जागतिक अर्थव्यवस्थेचे इंजिन मानले जायचे. पण चीनी इंजिन बंद पडून त्याचा डबा झाला आहे. याचा अर्थ आता कुठल्यातरी दुसर्या इंजिनाने (दुसर्या देशाने) चीनी (अर्थव्यवस्थेच्या) डब्याला ओढण्याची गरज निर्माण झाली आहे.



आंतरराष्ट्रीय तज्ञानुसार चीनी सरकार जे आकडे प्रसिद्ध करते, ते सहसा विश्वासार्ह नसतात. विकास दराचेच उदाहरण द्यायचे झाल्यास तज्ञांच्या मते चीनी सरकार विकासदराची जी आकडेवारी प्रसिद्ध करते त्यापेक्षा प्रत्यक्षात विकास दर कमीच असतो. याचे अजून एक कारण सांगता येईल, ते म्हणजे चीनमध्ये सत्तेत असलेले कम्युनिस्ट पक्षाचे सरकार. हे सरकार जनतेसमोर आणि आंतरराष्ट्रीय समुदायासमोर स्वतःची चांगली प्रतिमा तयार करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते.
या अर्थव्यवस्थेच्या चढ उतरामागे आणि कमी विकासदराच्या मागे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे चीनी सरकारला आता, स्वतःचीनिर्यातदार देशहि संकल्पना पुसून टाकायची आहे. आतापर्यंत महाकाय चीन ची ओळख म्हणजे सर्व जगालाहरतऱ्हेच्या वस्तू निर्यात करणारा देशअशी होती. चीनी सरकारला आता असं जाणवू लागलं आहे कि, नुसता निर्यातदार देश म्हणून ओळख, ही काही फार काळ टिकणारी नाही आणि एखाद्या देशासाठी निर्यातीबरोबर आयातसुद्धा खूप महत्वाची असते. तर देशाचा अर्थव्यवस्थारूपी गाडा नीट चालतो. हेच एका सक्षम आणि सुदृढ अर्थव्यवस्थेचे लक्षण म्हणायला हरकत नाही. चीनला निर्यात आणि गुंतवणुकीच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अर्थव्यवस्थेला उपभोगीय आणि सेवा क्षेत्रात अग्रेसर बनवायचे आहे.
अर्थशास्त्रात Dumping ही संकल्पना अस्तिवात आहे. याचा अर्थ आपल्या देशांतील माल दुसऱ्या देशात जाऊन आपल्या देशात असलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीला विकणे. असे अनेक उद्योग चीन आज पर्यंत करत आला आहे. खुद्द भारताचेच पहा ना आपल्याकडील बाजारात चीनने गणपतींच्या मुर्त्यांपासून ते टिकल्यां पर्यंत(स्वतःच्या देशांत टिकली/कुंकू लावण्याची प्रथा नसतानाही) सर्व काही अत्यंत कमी किमतीत विकले आहे. आपल्या इकडील इलेक्ट्रॉनिक मार्केट चीनने जणू काबीज केले आहे. वेगवेगळ्या चीनी वस्तूंचा सुळसुळाट झाला आहे. चीनने नेहमीच क्वालिटी पेक्षा क्वांटीटी ला महत्व दिले आहे. पण याचा परिणाम असा झाला कि चीनने आपल्या वस्तूंसंबंधीची विश्वासार्हता गमावली आहे. 




चीनने आतापर्यंत आम्ही वस्तू उत्पादनात giant आहोत असे दाखवले, जिथे अमेरिका पोहोचली नाही अश्या प्रदेशात जाऊन आपला माल विकला. विशेषकरून आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका खंडावर लक्ष केंद्रित करून त्याप्रमाणे स्वतःची निर्यात वाढवली. चीनने आफ्रिका खंडातील देशांबरोबर त्यांचे संबंध खूप सुधरवले आहेत. किती? याचे उदाहरण द्यायचे झाल्यास मध्यंतरी झिम्बाब्वे हा देश अत्यंत बिकट आर्थिक संक्रमणातून जात होता, त्या देशात चलनवाढीने परिसीमा गाठली होती. सामान्यांना जिणे जर्जर झाले होते. मग अश्या परिस्थितीत चीनाने संधी ओळखून मदतीचा हात (?) पुढे केला, आणि आता परिस्थिती अशी आहे कि झिम्बाब्वे ने चीनच्या युआन चलनाला स्वताच्या देशाचे चलन म्हणून घोषित केले आहे. अशी चीनची ख्याती अपारच आहे. 




नुकतंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये प्रमुख चलनानबरोबर आता चीनच्या युआन चलनाचा सुद्धा समावेश झाला आहे. त्यामुळे चीनचे जगात प्रस्थ वाढले आहे. अमेरिकेला शह देणाऱ्या चीनने आता सेवा क्षेत्र आणि उपभोक्त्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या गोष्टी ठीक असल्या तरी आता चीनी अर्थव्यवस्थेमध्ये मुलभूत बदल होणार काय हे बघावे लागेल, निर्यातीवर परिणाम झाला तर आयात वाढून देशाच्या जमा खर्चाच्या ताळेबंदावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. परिणामी जो चीन निर्यात वाढवून इतर देशांना आपल्या कब्जात घेत होता तो चीन आता तेवढासा परिणाम साधू शकणार नाही असे दिसते. याचा सगळ्यात मोठा परिणाम हा चीनच्या परराष्ट्र धोरणावर होईल यात शंका नाही. म्हणून येत्या काळातमहाकाय ड्रॅगनहे बिरूद चीन लावू शकेल का हे पाहणे अभ्यासाचे ठरेल.


-निखील कासखेडीकर

टिप्पण्या

  1. खूप छान निखिल ! भाषा खूपच सोपी आणि सहज असल्याने मला (की जीला अर्थशास्त्रात काडीचाही रस नाही) वाचावेसे आणि समजुन घ्यावेसे वाटले. असाच लिहीत रहा आणि आम्हाला शिक्षित कर .

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद स्नेहल! तुमच्या शुभेच्छा माझ्या मागे आहेतच, त्यामुळे मी नवीन नवीन विषय तुम्हा सगळ्यांसमोर मांडेल, तुम्हाला ते समजतील आणि आवडतीलही.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...