मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आंतरराष्ट्रीय संबंधाविषयी थोडेसे...

'आंतरराष्ट्रीय संबंध' हा एक अभ्यासाचा अफलातून विषय आहे, ज्यात जागतिक पातळीवर दोन देशांचा किंवा अनेक देशांचे एकमेकांशी असलेले नाते अभ्यासणे हा प्रमुख घटक मानला जातो. आज अनेक देशांना मुलभूत समस्या भेडसावत आहे, लोकसंख्या प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, शुद्ध पाणी मिळण्याची समस्या आहे. दुसरीकडे दहशतवाद, तसेच मूलतत्ववाद्यांचा धोका सा-या मानवतेला जाणवू लागला आहे. अनेक         मूलतत्ववादी संघटना आजमितीला संपूर्ण जगावर कब्जा करण्यासाठी जणू वाट पाहत आहे. अश्या परिस्थितीमध्ये या सर्व समस्यांची उकल करणे हे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अपेक्षित आहे आणि गरजेचं पण आहे. वरील सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी, त्यातून मार्ग काढून हे प्रश्न परत उद्भवणार नाहीत यासाठी जागतिक पातळीवर अनेक मोठ्या सरकारी, बिन सरकारी, किंवा ज्याला आपण IGO's म्हणू शकतो अश्या सर्व प्रकारच्या संघटना त्यात्या ठरवून दिलेल्या क्षेत्रात काम करत आहे. यात सगळ्यात महत्वाची संघटना जिचा उल्लेख करणे अनिवार्य आहे ती म्हणजे संयुक्त राष्ट्रे किंवा संयुक्त राष्ट्र संघटना.  मुख्यत: राजकीय विषय या सं...